
अनिकेत नलावडेची कर्णधारपदी निवड
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे बीसीसीआय पुरुष अंडर २३ सी के नायडू ट्रॉफी सामन्यांसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदी अनिकेत नलावडे याची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव कमलेश पिसाळ यांनी संघ जाहीर केला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार, अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, एमसीए सहसचिव संतोष बोबडे, राजू काणे, सीईओ अजिंक्य जोशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र संघाचा आगामी सामना चंदीगड संघाविरुद्ध २५ ते २८ जानेवारी दरम्यान होणार आहे. हा सामना डेक्कन जिमखाना मैदानावर होईल. त्यानंतर तीरुप्पूर येथे १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र संघाचा सामना तामिळनाडू संघाविरुद्ध होणार असल्याची माहिती सचिव कमलेश पिसाळ यांनी दिली.
महाराष्ट्र संघ
अनिकेत नलावडे (कर्णधार), अनिरुद्ध साबळे, सचिन धस, हर्षल काटे, अर्शीन कुलकर्णी, अभिषेक पवार, अजय बोरुडे, विकी ओस्तवाल, क्षितिज पाटील, शुभम दासी, वैभव दरकुंडे, कौशल तांबे, दिग्विजय पाटील, साहिल औताडे, अब्दुस सलाम, रोशन वाघसरे.