
छत्रपती संभाजीनगर : कराटे इंडिया असोसिशन व इंडियन मार्शल आर्ट अकॅडमीतर्फे नुकत्याच मुंबई येथे घेण्यात आलेल्या खुल्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन सेंटेरनरी स्कूलच्या भार्गवी सारंग याडकिकर आणि सई सारंग याडकिकर या कराटेपटूंनी आपल्या वयोगटात सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकले.

या खेळाडूंना विनोद नवतुरे यांनी प्रशिक्षण लाभले आहे. या घवघवीत यशाबद्दल शाळेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.