
छत्रपती संभाजीनगर : रांची (झारखंड) येथे २९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलांच्या संघ प्रशिक्षकपदी छत्रपती संभाजीनगर क्रीडा प्रबोधिनीचे शेख इम्रान यांची निवड करण्यात आली आहे.
वर्धा येथे महाराष्ट्र हॉकी संघाचे प्रशिक्षण शिबीर सुरू झाले आहे. महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा मानस शेख इम्रान यांनी व्यक्त केला. शेख इम्रान यांच्या मार्गदर्शनाखाली याआधी प्रबोधिनीच्या ३ मुली जुनिअर गटात भारतीय संघाकडून खेळल्या आहेत. शेख इम्रान यांच्या निवडीबद्दल जिल्हा हॉकी संघांचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे, शामसुंदर भालेराव, आझम सय्यद, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, प्रबोधिनी प्राचार्या पुनम नवगिरे आदींनी अभिनंदन केले आहे.