प्रत्येक शाळेत जलतरण साक्षरता मिशन : विकास मीना

  • By admin
  • January 24, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : ‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक इतर साक्षरतेप्रमाणेच जलतरण साक्षरता सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. ती काळाची गरज सुद्धा आहे. म्हणून ती प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलीच पाहिजे. २१ जानेवारीपासून सुरु झालेले राष्ट्रीय जलतरण साक्षरता दिन हा प्रत्येक शाळेत मोठ्या प्रमाणात साजरा करून विद्यार्थ्यांना जलतरण साक्षर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे .
.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेच्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी जगभरात सुमारे अडीच ते तीन लाख लोक पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडतात. यामध्ये भारतासारख्या देशामध्ये सर्वाधिक प्रमाण हे शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणांचे आहे. या विषयाकडे अजून सुद्धा गांभीर्यपूर्वक बघितले गेले नाही अशी खंतही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने व्यक्त केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना जलतरण विषयी संपूर्ण माहिती ही शालेय जीवनातच व्हावी. जेणे करून त्यांची पाण्याची भीती दूर होऊन विद्यार्थी जलतरण विषयी साक्षर होवू शकेल. या करीता यावर्षी राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन २०२५ मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने राबविण्यात येत आहे.

अंबेलोहळ येथील जिल्हा परिषद शाळेचे क्रीडा शिक्षक, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले हा उपक्रम मागील पंचवीस वर्षांपासून राबवित असून आतापर्यंत त्यांनी किमान पंधरा हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.

या वर्षापासून हे कार्य राष्ट्रीय स्तरावर होण्याच्या उद्देशाने याची व्याप्ती वाढवून ते संपूर्ण देशभर राबविले जाणार आहे. या राष्ट्रीय मिशनचे घोष वाक्य आहे ‘आवाज दो’ म्हणजे जागृत करा, एकमेंका ना सांगा, जनजागृती करा, शिक्षित करा म्हणजेच
जलतरण साक्षर करा. यावर्षीचा महत्वाचा उद्देश म्हणजे जलतरणाची तोंडी माहिती प्रत्येक विद्यार्थ्याच्या कानावर पडली पाहिजे. म्हणजे पोहण्या अगोदर विद्यार्थ्यांना पाणी म्हणजे जल, म्हणजेच जलस्रोत ज्यामध्ये तो पोहण्याचा विचार करतो. त्या विषयी संपूर्ण माहिती देणे. त्यामध्ये प्रामुख्याने विहिर, आड, बारव, नदी, नाला, ओढा, खदान, डोह, बंधारा, तळे, शेततळे, सिंचन प्रकल्प, सरोवर, तलाव, खाडी,
समुद्र इत्यादी विषयी खडानखडा माहिती देणे हा आहे. हा माहिती देण्याचा उपक्रम प्राथमिकता देऊन प्रत्येक शाळेत राबविला जावा असे आवाहन छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण (प्राथमिक), अश्विनी लाटकर (माध्यमिक) यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी समाधान आराक, दीपाली धावरे, हेमंत उशीर, क्रांती धसवाडीकर, श्रीराम केदार, अनिल पवार, रंगनाथ आढाव, विलास केवट तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे, विद्या दीक्षित, लईक सोफी, संगीता गायकवाड, सीताराम पवार, दिलीप सिरसाठ, जयेश चौरे, विजय दुतोंडे, अरविंद कापसे, अनिल कुमार सकदेव, मनीष दिवेकर, बाळासाहेब म्हस्के, धनराज कांबळे, मनिषा वाशिंबे, कल्पना पदकोंडे, रमेश ठाकूर, डी के फुसे, शिवाजी भोसले, मुश्ताक शेख, अनिल पुदाट, राजेश महाजन आदींनी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *