डॉ आंबेडकर, स्वामी विवेकानंद, डॉ अँटोनी डीसिल्वा, क्वीन मेरी अजिंक्य

  • By admin
  • January 24, 2025
  • 0
  • 102 Views
Spread the love

आंतर शालेय कबड्डी स्पर्धा 

मुंबई : मुंबई शालेय क्रीडा असोसिएशन आयोजित ८२ व्या आंतर शालेय कबड्डी स्पर्धेत शालेय संघटनेस संलग्न ४२ संघांनी सहभाग घेतला. आझाद मैदान येथे आयोजित या स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने मुलींच्या १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात चेंबूर येथील स्वामी विवेकानंद शाळेने तर १६ वर्षांखालील मुलांच्या गटात दादरच्या डॉ अँटोनी डिसिल्वा शाळेने विजेतेपदाचा मान मिळवला. 

स्पर्धेचा बक्षिस समारंभ वीणा खवळे शेलटकर, श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी खेळाडू, शालेय संघटनेचे अध्यक्ष फादर ज्युड रॉड्रिग्ज, सचिव एझमेरो फिग्रेडो सारा अल्पंनसो, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सदस्य राजाराम पवार, राम अहिवले यांच्या हस्ते संपन्न झाला. एमएसएसएस भारतीय खेल सचिव दीपक शिंदे व खेळ उपसमिती सदस्य रवींद्र विसपुते यांनी या स्पर्धा आयोजनात मोलाची जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेचा अंतिम निकाल

१६ वर्षांखालील मुले (डॉ व्ही डी घटे चॅलेंज शिल्ड) : १. डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल, दादर, २. सेंट आंन्स हायस्कूल, मालाड, ३. स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर.

१६ वर्षांखालील मुली (श्रीमती सरस्वतीबाई मंत्री शिल्ड) : १. क्वीन मेरी स्कूल, ग्रँट रोड, २. सेंट आंन्स हायस्कूल, मालाड, ३. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल, मिरा रोड.
१४ वर्षांखालील मुले (श्री बालमोहन शिल्ड) : १. स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर, २. डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल, दादर, ३. आर्यन एज्युकेशन सोसायटी, गिरगाव.

१४ वर्षांखालील मुली :१. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, विक्रोळी, २. श्री चंदुलाल नानावटी हायस्कूल, विलेपार्ले, ३. नालंदा पब्लिक स्कूल, मुलुंड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *