
अंतिम सामन्यात यंग इलेव्हनवर ६१ धावांनी विजय; शेख मुकीम मालिकावीर
गणेश माळवे
सेलू : नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत असरार इलेव्हन संभाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले.
सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी तहसीलदार डॉ शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, प्रसिद्ध उद्योजक आर बी घोडके, नितीन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, सचिव संदीप लहाने, तालुका प्रमुख बाबा काटकर, मिलिंद सावंत, कल्याण पवार, हरीभाऊ काळे, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन चषक क्रिकेट स्पर्धेत असरार संभाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले तर यंग इलेव्हन संभाजीनगर संघ उपविजेता ठरला. बक्षीस वितरण सोहळ्यात लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील, श्रीकांत विटेकर, माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, ॲड अशोक अंभुरे, उपसभापती नारायण भिसे, पवन आढळकर, मिलिंद सावंत, सचिव संदीप लहाने, बाबा काटकर आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
नितीन चषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या असरार इलेव्हन संभाजीनगर संघाने २ लाख रुपये व चषक पटकावले. हे रोख पारितोषिक आ राजेश विटेकर यांच्या वतीने देण्यात आले. चषक नामदेव डख यांच्या वतीने देण्यात आला. उपविजेत्या यंग इलेव्हन संभाजीनगर संघाला रोख १ लाख रुपये आचार्य रामेश्वर महाराज यांच्यावतीने देण्यात आले. मालिकावीर पुरस्कार शेख मुकीम यास २१ हजार रुपये व चषक न्युज अरिहंत गॅस एजन्सी पारस काला यांच्या वतीने देण्यात आले.
असरार इलेव्हन संभाजीनगर आणि यंग इलेव्हन संभाजीनगर यांच्यात विजेतेपदाचा सामना झाला. असरार संघाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात सहा बाद २१९ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्यात मोईद्दीन शेख (३१), प्रवीण देशेट्टी (६७), सलमान अहमद (३४), विनायक भोईर (३९) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. यंग इलेव्हनच्या वतीने स्वप्नील चव्हाण याने ३ गडी बाद केले. अमित पाठक व सय्यद अब्दुल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
यंग इलेव्हन संभाजीनगर संघासमोर विजयासाठी २२० धावांचे आव्हान होते. यंग इलेव्हनने १९ षटकात सर्वबाद १५८ धावा केल्या. त्यात अमित पाठक (३८), इंद्रजीत उढाण (३६), नितीन फोलाने (२४), शुभम मोहिते (१४) यांनी आपले योगदान दिले. असरार इलेव्हन संघाच्या शाश्वत पाठक याने ३ गडी बाद केले. उमर खान व प्रतिक भालेराव यांनी प्रत्येकी २ गडी तंबूत पाठवून ६१ धावांनी नितीन चषक जिंकला.
या सामन्यात पंच म्हणून सय्यद जमशेद, महेश जहागिरदार यांनी काम पाहिले. सामन्याचे धावते वर्णन पवन फुलमाळी, यासेर शेख, विजय वाघ यांनी केले. गुणलेखन सलमान सिद्दिकी यांनी केले. दीपक निवळकर, वैभव सरकटे, माझ अन्सारी, काफिल बागवान यांनी आपली भूमिका पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माधव लोकुलवार, गणेश माळवे, नागेश कान्हेकर, हमीद गुत्तेदार, बंडू देवधर, रमेश दुसरे, मोहनराजे बोराडे, अब्दुल भाई, पांडुरंग कावळे, धनंजय कदम, राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, दीपक निवाळकर, गजानन शेलार, कपिल ठाकूर, मसूद अन्सारी, अभिजीत चव्हाण, सलमान सिद्दीकी, झीशान सिद्दीकी, मोईन शेख, सुरज शिंदे, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता.