शाळा-कॉलेजमध्ये क्रीडा शिक्षकांची पदे तात्काळ भरावीत

  • By admin
  • January 25, 2025
  • 0
  • 62 Views
Spread the love

अध्यापक भारती संस्थेतर्फे मागणी

येवला : शारीरिक शिक्षण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून त्या-त्या शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार नव्या पद्धतीने क्रीडा शिक्षक पद भरती करावी या मागणीचे निवेदन येवला तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार पंकज मगर यांना अध्यापक भारतीच्या वतीने देण्यात आले.

शारीरिक शिक्षण शिक्षक अर्थात क्रीडा शिक्षक नियुक्ती सूत्र सन २००५ चा शासन निर्णय २५० विद्यार्थी पटसंख्या मागे एक क्रीडा शिक्षक पद मान्यता या नियमात बदल करून तो आता नव्याने शंभर ते दीडशे विद्यार्थी पटसंख्या मागे एक क्रीडा शिक्षक पद मान्यता असा करून तात्काळ क्रीडा शिक्षक पदे भरण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र शासनास राष्ट्रीय बालक:विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीच्या वतीने करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अधिक मानसिक, सुदृढ, सशक्त करणे आवश्यक आहे. अशक्त शारिरीक शिक्षण धोरण सशक्त करून शाळा-महाविद्यालयात क्रीडा शिक्षक कर्मचारी नियुक्ती करून शाळा, महाविद्यालयात क्रीडा साहित्य तात्काळ पुरवावे अशी मागणी शारीरिक शिक्षण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात कला, क्रीडा विद्यापीठ स्थापन व्हावे, कला, क्रीडा, संगणक, कार्यानुभव विषय शिक्षक तात्काळ नियुक्त करण्यात यावे अशी मागणी अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ उंडे, भारतीय अकॅडमी येवलाचे संचालक राजरत्न वाहुळ यांनी मागणी केली असून गायत्री खोकले, सायली दिघे, प्रवीण गायकवाड, नंदकिशोर सोमासे, तन्मय पगारे, अमोल राजगुरू यांच्या निवेदनाद्वारे स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *