
मणिपूर संघाला उपविजेतेपद, महाराष्ट्राच्या श्रावणी डिके, इरा माकोडेला पदके
पुणे : पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो संघटनेतर्फे आयोजित राष्ट्रीय कॅडेट स्पर्धेत हरियाणा संघाने ४ सुवर्णपदक आणि ५ कांस्यपदक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले तर, मणिपूर संघाने ४ सुवर्णपदक आणि १ कांस्यपदक मिळवून उपविजेतेपदक मिळवले. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील श्रावणी डिके हिने ५७ किलोखाली गटात रौप्यपदक तर, ठाणेच्या इरा माकोडे हिने रौप्य पदक मिळवले.

बालेवाडी-म्हाळूंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे झालेल्या कॅडेट गटामध्ये ७० किलोखालील गटामध्ये ठाणेच्या इरा माकोडे हिने रौप्य पदक मिळवले. इरा ही मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबीवली येथील सेव्हन फायटर्स क्लब येथे सराव करते. या गटात मणिपूरच्या युमनाम बिलीलीया हिने सुवर्णपदक मिळवले. यवतमाळ जिल्ह्यातील श्रावणी डिके हिने ५७ किलोखाली गटात रौप्यपदक संपादन केले. श्रावणी ही दिग्रस तालुकामध्ये रवी भूषण कदम यांच्याकडे सराव करते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण कुस्ती प्रशिक्षक आणि अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले, तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे, मुंबई पॉलिसीचे पूर्व आयुक्त हेमंत नगराळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी केले. तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे यांनी आभार मानले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्यांना करंडक तर, पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम आणि मेडल्स देण्यात आली. ५२ किलोखालील गटातील छत्तीसगढ राज्याच्या रंजीथा करोटे हिला स्पर्धेचे उत्कृष्ट महिला ज्युदोपटू या श्रेणीतील कै. आमदार मुक्ता शैलेश टिळक स्मृतीप्रित्यर्थ ठेवण्यात आलेला चषक प्रदान करण्यात आला.

स्पर्धेचा अंतिम निकाल
कॅडेट गट मुली विभाग : ५७ किलोखालील गट : १. लगन लक्शाकर, उत्तरप्रदेश, २. श्रावणी डिके, महाराष्ट्र, ३. दर्जदा खुशबू, गुजरात व सिष्टी, हरियाणा. ६३ किलोखालील गट : १. मोनिका केएच, मणिपूर, २. बरनोश्री कोले, पश्चिम बंगाल, ३. जेश्ना अहुजा, पंजाब व लवनीत मलिक, हरियाणा. ७० किलोखालील गट : १. युमनाम बिलीलीया, मणिपूर, २. इरा माकोडे, महाराष्ट्र, ३. दीक्षा, हरियाणा व सोनाक्षी पंडीत, राजस्थान. ७० किलोवरील गट : १. राधिका, हरियाणा, २. शानसा सरकार, पश्चिम बंगाल, ३. हरपुनित कौर, पंजाब व हिपांशी पनवर, हरियाणा.
कॅडेट गट मुले विभाग : ६० किलोखालील गट : १. तिटुन ताबा, अरूणाचल प्रदेश, २. नितीन बलहारा, दिल्ली, ३. कपिल दमाई, छत्तीसगढ व युमनाम योहेनबा, मणिपूर. ७३ किलोखालील गट : १. हर्षित, हरियाणा, २. करणवीरसिंग मान, पंजाब, ३. हर्षवर्धन, पंजाब व प्रिन्स, उत्तर प्रदेश. ८१ किलोखालील गट : १. भाव्य सिंग, हरियाणा, २. अश्विन भारद्वाज, राजस्थान, ३. पार्थ धानिया, दिल्ली व मीत पारखे, गुजरात.
९० किलोखालील गट : १. राम कुमार, पंजाब, २. कार्तिक भारव्दाज, दिल्ली, ३. रोहित पांघल, हरियाणा व मनमोहन सिंग, राजस्थान. ९० किलोवरील गट : १. बाबनुर सिंग, राजस्थान, २. भविष्य, दिल्ली, ३. पुशय मित्तर, पंजाब व अक्क्षज पिल्ले, महाराष्ट्र.