
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या खेळाडूंनी विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेत चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विश्वजीत कुलकर्णी (तलवारबाजी), ऋषभ जाधव (तलवारबाजी), शुभम सरकटे (जिम्नॅस्टिक), साक्षी डोंगरे (जिम्नॅस्टिक) आणि मोहिनी कातुरे (पिस्टल शूटिंग) आदी विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ परमिंदर कौर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ दिनेश वंजारे व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
या सर्व विजेत्या खेळाडूंचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ दिनेश वंजारे, डॉ शशिकांत सिंग, डॉ सदाशिव जव्हेरी, डॉ श्रीनिवास मोतीयेळे, रहीम खान, प्रवीण शिंदे, निलेश खरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तलवारबाजीच्या खेळाडूंना डॉ दिनेश वंजारे, जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंना प्रवीण शिंदे तर पिस्टल शूटिंगच्या खेळाडूंना डॉ गीता म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले आहे.