
राष्ट्रीय कराटे स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर :गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत ५० पदकांची कमाई करत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
पोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धा झाली. या स्पर्धेत मिशन मार्शल आर्ट्स अँड वुशु कुंग-फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन (इंडिया) छत्रपती संभाजीनगर संघाने काता आणि कुमिते प्रकारात २४ सुवर्ण, १२ रौप्य आणि १४ कांस्य पदके जिंकली.
या स्पर्धेचे आयोजन ट्रॅडिशनल कराटे डो ओकिनावा अँड कुबडो कैकोकाय गोवा इंडिया या संघटने केले होते. प्रमुख पाहुणे ग्रँडमास्टर लानम लामा, अयान चक्रवर्ती, दीपक कुराडे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व पदकांचे वितरण करण्यात आले.
मिशन मार्शल आर्ट्स असोसिएशन छत्रपती संभाजीनगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन घुगे, सचिव व मुख्य कराटे प्रशिक्षक प्रवीण घुगे, महिला प्रशिक्षक नंदा घुगे, राधा घुगे यांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभत आहे.
पदक विजेते खेळाडू
मुली : तनुश्री घुगे (१ सुवर्ण), अनुश्री घुगे (१ सुवर्ण), ओजस्वी बारगजे (१ सुवर्ण), आर अरुंधती (१ सुवर्ण), ओवी पाटील (२ सुवर्ण), आश्लेषा रिडलॉन (२ सुवर्ण), समीक्षा जांभळकर (२ सुवर्ण), तनुश्री राठोड (१ सुवर्ण व १ कांस्य), सांची लहाने (१ सुवर्ण व १ कांस्य), ऋतुजा भालेराव (२ रौप्य), जोहा सय्यद (२ रौप्य), नव्या दरगड (१ रौप्य व १ कांस्य), स्वनिका जैन (१ रौप्य व १ कांस्य), ओजस्वी करांडे (२ कांस्य).
मुले : अर्णव रिडलॉन (१ सुवर्ण), जय राठोड ( १ सुवर्ण व १ रौप्य), अभिजित देशमुख (१ सुवर्ण व १ कांस्य), गजराज चावरिया (१ सुवर्ण व १ कांस्य), रुद्र चव्हाण (१ सुवर्ण व १ रौप्य), मयूर चव्हाण ( १ सुवर्ण व १ रौप्य), श्रेयश पेरे.(१ सुवर्ण व १ कांस्य), स्वराज गायकवाड (२ रौप्य), वीरेंद्र राठोड (१ रौप्य व १ कांस्य), रुत्विक जोशी (२ कांस्य), आयुष ठाणगे (१ सुवर्ण व १ कांस्य).
या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक कोमल राठोड, ऋतुजा रणवाळकर, प्रशिक्षक शाम बुधवंत, राम बुधवंत, राम चौरे, गौरव टोकटे, कृष्णा कानडे व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.