
छत्रपती संभाजीनगर : आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वरद्वारे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा आणि एमजीएम वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एमजीएम कॉलेज बीएमसीजेचे डॉ शेख शाहेद हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक ऑटोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर विनय पनियार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सानिया मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर मिहीर मुळे, एमआयएमचे ज्येष्ठ नेते नासिर सिद्दिकी, रहेबर उर्दू डेलीचे संपादक जमीर अहमद खादरी, चेतन राजपूत हे उपस्थित होते. शायनिंग स्टार शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा, एमजीएम वस्तानवी शाळेच्या मुख्याध्यापक अमरीन खान हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख आरीफ यांनी केले. वैष्णवी देहाडे यांनी आभार मानले. क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मदिहा फातेमा, शुभांगी कुलकर्णी, बुरहाना पठाण, फौजिया शेख, सुमैया शेख, धनश्री खिल्लारे, भक्ती बाळुबेटाळसे, शेख निदा, सैय्यद सोनम, शेख निलोफर, सैयद सादिया, शेख जिनत, आशा ढोकणे, सलमा खाला, नफीसा खाला, शेख आरिफ आदींनी पुढाकार घेतला होता.