बॉक्सिंग स्पर्धेत शनाया सोनवणे, हर्ष तोमर, प्रगती थिटेची चमकदार कामगिरी

  • By admin
  • January 25, 2025
  • 0
  • 181 Views
Spread the love

पुणे शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजन

पुणे : पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे आजीव अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील साई बॉक्सिंग क्लबची शनाया सोनवणे हिने शानदार खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेतील ‘बेस्ट बॉक्सर’ पुरस्कार पटकावला. तसेच हर्ष तोमर (स्टार बॉक्सिंग अकॅडमी खडकी) याने बेस्ट चॅलेंजर पुरस्कार, तर मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर म्हणून
प्रगती थिटे (विरा अकॅडमी फुरसुंगी पुणे) यांना गौरवण्यात आले. या स्पर्धेत एकूण १५२ बॉक्सरने सहभाग घेतला होता.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे आजीव अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी पुणे शहर संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते राकेश कळसकर, विजय यादव, सलमान शेख, पुणे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, तसेच पुणे जिल्हा संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, प्रशिक्षक सुनील काळे, आंतरराष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन तूक बहादुर थापा, अमोल सोनवणे, प्रशिक्षक निलेश खुडे, दिलीप मोरे, विनोद कुंजीर हे मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे शहर रिंग ऑफिशियल कमिशन चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, राज्याचे तांत्रिक अधिकारी अशोक मेमजादे, जीवनलाल निंदाने, बंडू गायकवाड, उमेश जगदाळे, डॉ राहुल पाटील, सनी परदेसी, रॉबर्ट दास, कुणाल पालकर, रेखा चोरमुले, अजिंक्य कांचन, मनोज यादव, मंगेश यादव, संजय यादव, मृणाल भोसले, प्रदीप वाघे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर संघटनेचे कार्याध्यक्ष मदन वाणी यांनी केले. पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *