
सातारा : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिन कवायत संचलन सांस्कृतिक कार्यक्रमासह सर्व पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली.
ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्हाचे सुपुत्र खाशाबा जाधव यांचे पुस्तक भेट देऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी बॅडमिंटन खेळून उपस्थित खेळाडू, अधिकारी यांची मने जिंकली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल म्हेत्रे, विक्रांत चव्हाण, नागेश गायकवाड, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, पोलिस निरीक्षक निलेश तांबे उपस्थित होते.