सोलापूर येथे ७६ किलोमीटर सायकल राईडद्वारे प्रजासत्ताकदिन साजरा

  • By admin
  • January 26, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

सोलापूर : ७६व्या गणतंत्र दिनानिमित्त सायकल लवर्स ग्रुपर्फे ७६ किलोमीटर सायकलिंग राईड उपक्रम राबवण्यात आला.

‘सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा’ हा जनजागृतीचा आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण संदेश या माध्यमातून देण्यात आला. आरोग्य आणि आनंद याची सांगड घालण्याचा सायकलिंग हा उत्तम मार्ग आहे असाही मूलमंत्र या राईडच्या माध्यमातून सायकल लवर्सकडून देण्यात आला.

सोलापूरचे गुप्त वार्ता विभागाचे डीवायएसपी नागेश गायकवाड यांनी राईडचा फ्लॅग ऑफ करून रॅलीला हिरवा कंदील दिला. ही सायकल राईड भैय्या चौकात सुरू झाली. ही राईड वंदे मातरम्‌‍‍च्या घोषात कामती आणि माचणूर मंदिरापर्यंत जाऊन परत सोलापूर अशी ७६ किलोमीटर अंतराची राईड सर्व सायकलपटूंनी उत्साहात पूर्ण केली. या सायकल राईडचे नियोजन सायकल लव्हर्सचे संयोजक प्रवीण जवळकर, डॉ रूपाली जोशी, दादाराव इंगळे आणि अविनाश कुरापटी यांनी केले होते.

७० सायकलपटूंचा सहभाग
या सायकल राईडमध्ये ७० सायकलपटूंनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यामध्ये ११ वर्षे वयोगटापासून ते ६५ वर्षे वयोगटातील सायकलपटूंचाही सहभाग होता. ११ वर्षीय जय जोशी आणि ऋषी कंदलगावकर यांनी ५० किलोमीटर अंतर आणि महिला गटामध्ये डॉ शर्वरी आयाचीत यांनी १०० किलोमीटरअंतर पार करत विशेष लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *