
जळगाव येथे क्रीडा पुरस्कारांचे वितरण
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू व मार्गदर्शक यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवारी पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर उत्कृष्ट क्रीडापटू, दिव्यांग खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २६ जानेवारी रोजी क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षी सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षांचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रम प्रसंगी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जळगाव महानगरपालिका आयुक्त डेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी स्वप्नील कैलास महाजन (आट्यापाट्या), निवेदिका बाळकृष्ण कोळंबे (आट्यापाट्या), सीमा रामचंद्र माळदकर (हँडबॉल), उदय अनिल महाजन (वेटलिफ्टिंग), रोशनी सलीम खान (आट्यापाट्या), पुष्पक रमेश महाजन (तायक्वांदो), नेहा नितीन देशमुख (सॉफ्टबॉल), डॉ जयंत भालचंद्र जाधव (सॉफ्टबॉल) यांचा जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आला.