नांदेड : हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडच्या वतीने नांदेड सबज्युनिअर बेसबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील मुले व मुलींची निवड चाचणी २८ जानेवारी रोजी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर (नांदेड) येथील मैदानावर घेण्यात येणार आहे.
या निवड चाचणी स्पर्धेसाठी खेळाडूंनी सोबत येताना वयाचा पुरावा आधार कार्ड, दोन फोटो व आवश्यक साहित्य सोबत आणावेत. खेळाडूंनी मैदानावर आनंदा कांबळे व बालाजी गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणीतून निवडलेल्या संघ ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत अमरावती येथे होणाऱ्या १६ व्या सबज्युनियर राज्यस्तरीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होईल.
या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत तिकडे पाटील, उपाध्यक्ष नारसिंग आठवले आणि सचिव आनंदा कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आनंदा कांबळे (7447677632, 8329157440) व बालाजी गाडेकर (9921855097) यांच्याशी संपर्क साधावा.