
एकलव्य क्रीड संकुलतर्फे आयोजन, ४५०० खेळाडूंचा सहभाग
जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेएशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुलतर्फे आयोजित करण्यात आलेला केसीईएस क्रीडा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
केसीईएस क्रीडा महोत्सव समारोप सोहळ्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा एस टी कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, केसीई सोसायटीचे सचिव अॅड प्रमोद पाटील, सहसचिव अॅड प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी टी पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य भालचंद्र पाटील, डॉ शिल्पा बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, एम जे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आणि एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ रणजित पाटील यांच्यासह केसीई सोसायटीच्या विविध विद्याशाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक तंदृस्तीसाठी खेळ महत्वाचे आहेत. तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळ, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जाणीवा उच्च प्रतीच्या असतात. त्यामुळे ते सगळ्यात पुढे असतात असे मनोगत यावेळी मांडले.
केसीईएस क्रीडा महोत्सवात यंदा पहिल्या वर्षी १२ क्रीडा प्रकारात साडेचार हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात विजयी १४०० खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ युवा कुमार रेड्डी, डॉ बी व्ही पवार, डॉ के बी महाजन , डॉ संजय सुगंधी, प्रा राजेंद्र ठाकरे, प्रा के जी सपकाळे, प्रा सुषमा कांची व प्रा प्रणिता झांबरे उपस्थित होते. क्रीडा महोत्सवातील स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समिती सचिव डॉ श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले. या कार्यक्रमात एकूण १४०० विद्यार्थी खेळाडूंचा त्यांच्या स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीनुसार सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाने सत्कार करण्यात आला. तसेच या स्पर्धेतील चॅम्पियनशिप ट्रॉफी अनुक्रमे प्री प्रायमरी विभाग (नर्सरी ते सिनिअर केजी), शालेय प्राथमिक विभाग (इयत्ता १ ते ४), शालेय माध्यमिक विभाग (इयत्ता ५ ते ९), महाविद्यालयीन विभाग (इयत्ता ११ ते पोस्ट ग्रज्युएशन) या प्रमाणे देण्यात आली. यात केसीईएस किलबिल बालक मंदिर, केसीईएस ओरिऑन सीबीएसई इंग्लिश स्कूल, केसीईएस ओरिऑन स्टेट बोर्ड इंग्लिश स्कूल, केसीईएस स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांनी चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली. केसीईएस ओरिऑन सीबीएसई इंग्लिश स्कूल संघाने जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. उत्कृष्ट पथसंचलन ट्रॉफी भूमिका गरुड हिने जिंकली आहे.