
‘मी देखील खेळाडू आहे, मला क्रीडा संघटनांच्या प्रश्नांची चांगली माहिती आहे’
नाशिक : नाशिक सिन्नरचे आमदार ॲड माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने नाशिकच्या विविध क्रीडा संघटनांच्या वतीने कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
यामध्ये कालिका देवी मंदिर संस्था, क्रीडा संस्कृती फाउंडेशन, यशवंत व्यायाम शाळा, व्हॉलिबॉल संघटना, तलवारबाजी संघटना, कॅरम, सेपक टाकरा, टेनिस व्हॉलिबॉल, जम्प रोप, नाशिक जिल्हा तालीम संघ, रोलबॉल, खेलो मास्टर्स संघटना, स्क्वॉश रॅकेट, एनटीपीएस स्पोर्ट्स क्लब, एकलहरे, हॉकी संघटना, पोलिस बॉईज क्लब, बेस बॉल संघटना, सॉफ्ट बॉल संघटना, फुटसाल संघटना, मुक्तांगण संस्था अशा विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास केशव पाटील, हेमंत पांडे, राहुल देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक, दुधारे, आनंद खरे, ॲड गोरखनाथ बलकवडे, राजू शिंदे, संजय होळकर, क्रीडा संघटक रवींद्र मोरे, रामदास होते, उदय खरे, अश्पाक शेख, अशोक कदम, उत्तम दळवी, बाळु नवले, अशोक कचरे, दीपक निकम, सुभाष तलाजिया, राम पाटील, भरत पाटील, विक्रम दुधारे, मनीषा काठे, एस बी शिरसाठ, शशांक वझे, अविनाश ढोली, शुभाष बिरारीस, रमेश कोकाटे, अजित वेळजाळी, कुणाल शिंदे, अभिषेक सोनवणे, आयुष नागले, तन्मय कर्णिक, कुणाल देसाई, कुणाल परदेशी, अरूष सिंघ आदी क्रीडा संघटक आणि खेळाडू उपस्थित होते.
सिन्नर येथे क्रीडा संकुल उभारू :कोकाटे
सत्काराला उत्तर देताना मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, ‘कृषी विभागाची जबाबदारी आहे. परंतु, मी देखील खेळाडू आहे. खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा संस्था आणि क्रीडा संघटना यांना काय अडचणी आहेत ते मला माहित आहेत. माझ्याकडे क्रीडा विभाग नसला तरीही क्रीडा मंत्री भरणे यांच्याशी चर्चा करून क्रीडा विषयक ज्या-ज्या भरीव तरतुदी करता येतील त्यांची पूर्तता केल्याशिवाय मी राहाणार नाही असे सांगितले. तसेच सिन्नर येथे ५० एकर जागेमध्ये सर्व सुविधायुक्त असे भव्य क्रीडा संकुल उभारण्याची तरतूद करणार आहे. त्यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी हे फायदेशीर ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले.
सत्कारमूर्ती मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांची ओळख नितीन सुगंधी यांनी करून दिली. प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले. केशव पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. उदय खरे यांनी सूत्रसंचालन केले. आनंद खरे यांनी आभार मानले.