
छत्रपती संभाजीनगर : भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या साउथ एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अल हिदाया पब्लिक शाळेच्या चौथी वर्गाचा विद्यार्थी अब्दुल अजीज याने शानदार कामगिरी बजावत स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. या घवघवीत यशाबद्दल जेड एस वॉरियर अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहुर अली व वुशू वॉरियर अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद सद्दाम व कोच अजिंक्य नितनवरे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.