
१४ सुवर्ण पदकांसह ६० पदकांची कमाई
सोलापूर : युनिव्हर्सल शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत जत (सांगली) येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीच्या ३५ पैकी १४ स्पर्धकांनी आपापल्या वजनी व वयोगटात प्रथम, १६ स्पर्धकांनी द्वितीय आणि ३० स्पर्धकांनी तृतीय क्रमांक पटकावून या स्पर्धेतील मानाची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकाविली.
या स्पर्धेमध्ये भारतामधून सुमारे ५००हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सर्व विजयी स्पर्धकांना मुख्य कराटे प्रशिक्षक व आंतरराष्टीय पंच अनुराधा थोरात, सोनिया थोरात, विनायक गायकवाड व निशा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
काता प्रकारातील पदक विजेते
सुवर्ण : विश्वराज गरड, प्रियेश सुनकनपल्ली, ध्रुव ढगे, प्रथमेश चौधरी, विहान कांबळे, अध्या एकबोटे, महेवीश शेख, शिवप्रिया येलदी.
रौप्य : मयुरेश गुंटुक, वेदांत खोकले, स्वरूप पवार, वेदिका मिठ्ठाकोल, शुभरा पराळकर, शैझीन मैगेरी, शालिनी योहान, हर्षिता मारा.
कांस्य : दिलनवाज पठाण, कौस्तुभ आडम, सच्चिदानंद येलदी, धानेश बिराजदार, समीक्षा राऊत, आराध्या नळे, वेदिका कांबळे, सेजल कोरे.
कुमिते प्रकारातील पदक विजेते
सुवर्ण : निरंजन हनगंडी, विश्वराज गरड, ऋत्विक पोंनामांडा, प्रियेश सुनकनपल्ली, ध्रुव ढगे.
रौप्य : विरेंद्र भिमनपल्ली, धानेश बिराजदार, वेदिका मिठ्ठाकोल, शुभरा पराळकर, अध्या एकबोटे, समीक्षा राऊत, शैझीन मैगेरी, दिव्याराणी कोनकुंटला.
कांस्य : मयंक चौधरी, अथर्व खुणे, अंशुल गुंटुक, आराध्या गायधनकर, संस्कृती कुलकर्णी, चैत्राली गायधनकर, अक्षरा पंडील्ला, दिलनवाज पठाण, कौस्तुभ आडम, मयुरेश गुंटुक, वेदांत खोकले, स्वरूप पवार, प्रथमेश चौधरी, विहान कांबळे, सच्चिदानंद येलदी, आराध्या नळे, महेविश शेख, वेदिका कांबळे, सेजल कोरे, शालिनी योहान, शिवप्रिया येलदी, हर्षिता मारा.