
जालना : मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते डॉ पंढरीनाथ रोकडे यांचा गौरव करण्यात आला.
डॉ पंढरीनाथ रोकडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शारीरिक शिक्षण प्रशिक्षण उपकरण या विषयावर संशोधन करुन पेटंट मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रावसाहेब दानवे यांनी डॉ रोकडे यांचा सन्मान केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ पंढरीनाथ रोकडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भगवान डोंगरे, उपप्राचार्य डॉ गोवर्धन मुळक यांच्यासह सर्व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.