
मुंबई : भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला रग्बी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला रग्बी संघाने उपविजेतेपद पटकावले.
भुवनेश्वर येथे केआयआयटी विद्यापीठात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला रग्बी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला रग्बी संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठ व केआयआयटी विद्यापीठ ओडिशा यांच्यात अत्यंत चुरशीचा अंतिम सामना झाला.अंतिम सामना बरोबरीत सुटल्यामुळे ५ मिनिटाचा अतिरिक्त (एक्सट्रा टाईम) डाव खेळविण्यात आला. यात केआयआयटी विद्यापीठाने १ ट्राय करून विजय मिळवला व मुंबई विद्यापीठाच्या महिला रग्बी संघाला १५ साईड प्रकारात उपविजेतेपद मिळाले.
७ साईड विद्यापीठाचा महिला रग्बी संघ खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. मुंबई विद्यापीठ संघाकडून मानसी पवार, उज्वला घुगे, सोनाली शेलार, कायरा विंस्नेट्ट, वृषाली जळगावकर, सपना यादव, पौर्णिमा धिरडे, अक्षिता लाड, सांचल भोर, सारा डिसोझा, विद्या दिनकर, निता राठोड, सुमन रावत, अर्पिता तेली, मानसी महाजन, गार्गी डे, वैष्णवी पवार, पल्लवी कोकरे व दुर्गा भट यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.