
नाशिक : भिवंडी तालुक्यातील नियाज नॅशनल स्कूल मधील आवेस समीर मलबारी व उबैद रमजान शाह यांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचवी सब ज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे पार पडली. यात आवेस समीर मलबारी व उबैद रमजान शाह या दोन मुलांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच भिवंडी हे शहर क्रिकेटची नगरी म्हणून ओळखली जाते. हे दोघेही नियाज नॅशनल स्कूल, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे इयत्ता नववीमध्ये शिकत आहेत.
या निवडीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, नियाज नॅशनल स्कूलच्या ट्रस्टी फर्जिन चौधरी, नियाज नॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक व मुंबई झोन डायरेक्टर महेश अनिल मिश्रा व शाळेच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.