खेळाडू हीच देशाची खरी संपत्ती – सचिन इगे

  • By admin
  • January 27, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

धाराशिव अॅथलेटिक्स स्पर्धेत ७३० खेळाडूंचा सहभाग 

धाराशिव : ‘देशाचा उत्कृष्ट नागरीक घडण्यासाठी व आरोग्यासाठी खेळ हा महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने दररोज किमान २ तास खेळले पाहिजे. तसेच संघर्षातून निर्माण झालेले अस्तित्व हे नेहमीच खास असते. कारण त्यामागे मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांचा ठेवा असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी केले.

धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेचे उद्घाटन  सचिन इगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप, गुरुनाथ माळी,  जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, डिंपल ठाकरे, प्रभाकर काळे, गणेश सापते यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत जिल्ह्यातील ७३० मुले व मुलींनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी माउली भुतेकर व राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित सुरवसे, शितल देशमुख, ओमप्रकाश ढगे, योगिनी साळुंके, प्रणिता जाधवर, करण बिक्कड, विराज जाधवर यांनी यशस्वीपणे सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *