
पुणे : कोकणस्थ परिवार पुणे यांचे वतीने कोकणस्थ परिवारचे संस्थापक भाई नेवरेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त व माजी अध्यक्ष वस्ताद गुलाबराव सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.
पंडित नेहरू स्टेडियम येथे बबनराव परदेशी यांच्या हस्ते तालीम संघाचे विश्वस्त, विद्यमान अध्यक्ष तात्यासाहेब भितांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयराव सावंत हे होते.
नवीन खेळाडू तरुणांनी ज्येष्ठ मार्गदर्शक, संघटक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि माणसे जोडण्याची काम करावे कुस्ती क्षेत्रातील जुने जाणते पैलवान आजही आपले साठी आदर्श आहेत असे मनोगत गुलाबराव सोनवणे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्राध्यापक कुशाबा पिंगळे, वस्ताद माजीरे, शिवाजी बुचडे, रामचंद्र वामनाचार्य, तसेच मोहन देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रकाश रेणूसे अविनाश वावरे, डॉ मंजू जुगदर, सागर कुलकर्णी, नरहरी चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील नेवरेकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीनाथ हगवणे यांनी स्वागत केले. पराग गानू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नरेश पेडणेकर यांनी आभार मानले. रीना पाटील यांचे पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.