
४५ रक्तदात्यांचे रक्तदान
छत्रपती संभाजीनगर : इंडियन कँडेट फोर्सतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कमांडर विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आयसीएफचे सीनियर जगदीश खैरनार यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पैठण गोट परिसरातील आयसीएफ कार्यालय येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या प्रसंगी नरेंद्र पटेल, अजय भोसले, विजय पाटील, भगवान खाडे, फुलचंद सलामपुरे, दयानंद कांबळे, किशोर नरवडे, रिया नरवडे, राहुल अहिरे, सुरज सुलाने, निलेश लकडे, अशोक अंधारे, सचिन वेताळ, पंकज वाडेकर, अनिल भवर, सुरेश भापकर, प्रशांत घोडके, गणेश घटकार, कविता खैरनार, दीपाली वाडेकर, निलेश कर्डिले, आदित्य नरवडे आणि पृथ्वीराज नरवडे, कुणाल, इतर कॅडेट व नागरिक उपस्थित होते.
तसेच विभागीय रक्तकेंद्र व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांचे मुस्कान शेख, अस्मा सय्यद, मंजुश्री मगर, अनुसया घोगरे, उमा गरड, राजेंद्र लोखंडे, बबन वाघ, मजहर शेख, ईश्वर जाधव, तनिश सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.