
दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला १२० धावांनी नमवले, जोमेल वॉरिकन विजयाचा हिरो
मुलतान : वेस्ट इंडिज संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करुन एक नवा इतिहास रचला आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर पाकिस्तानात कसोटी जिंकण्याचा पराक्रम वेस्ट इंडिज संघाने केला आहे. या सनसनाटी विजयाचा हिरो ठरला तो जोमेल वॉरिकन. त्याने सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार पटकावले.
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाने १२० धावांनी विजय मिळवला आहे. ३५ वर्षांनंतर वेस्ट इंडिज संघाला पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकण्यात यश आले आहे. याआधी, वेस्ट इंडिजने शेवटचा सामना १९९० मध्ये पाकिस्तानविरुद्ध जिंकला होता. दुसरा कसोटी सामना जिंकून वेस्ट इंडिजने मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. वेस्ट इंडिजने पाकिस्तानला जिंकण्यासाठी २५४ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर पाकिस्तान संघ दुसऱ्या डावात फक्त १३३ धावा करू शकला.
मुलतान कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली आणि एकूण १८ विकेट्स घेत पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला. जोमेल वॉरिकन याला सामनावीर आणि मालिकावीराचे किताब देण्यात आले. पहिल्या कसोटी सामन्यात जोमेल वॉरिकन याने ३१ धावा केल्या होत्या आणि एकूण १० विकेट घेण्यात तो यशस्वी झाला होता. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात, जोमेल वॉरिकन याने फलंदाजीने ५४ धावा करत शानदार कामगिरी केली आणि ९ विकेट घेण्यात यशस्वी झाला.
पाकिस्तानने पहिला कसोटी सामना १२७ धावांनी जिंकला. दुसरीकडे, वेस्ट इंडिजच्या जोमेल वॉरिकन याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण १९ बळी घेतले. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात, जोमेल वॉरिकन याने २७ धावांत ५ बळी घेतले.
पाकिस्तान शेवटच्या स्थानावर
पाकिस्तान संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. कसोटीत पाकिस्तानसाठी हे निश्चित निराशाजनक आहे.
२०१९-२१ : सहाव्या स्थानावर
२०२१-२३ : सातव्या स्थानावर
२०२३-२५ : नवव्या स्थानावर