स्मृती मानधना वन-डेतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू !

  • By admin
  • January 27, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

अशी कामगिरी करणारी स्मृती पहिली भारतीय महिला खेळाडू

दुबई : भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिला आयसीसीने २०२४ च्या महिला एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर केला आहे.

मानधनाने एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर हा किताब जिंकून इतिहास रचला आहे. मानधनाने तिच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटपटूचा किताब जिंकण्यात यश मिळवले आहे. यासह, ती अशी कामगिरी करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू बनली आहे. त्याचबरोबर, स्मृती मानधना ही भारताची पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. स्मृती मानधनाने २०१८ सालसाठी पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर किताब जिंकला होता. आता मानधनाला २०२४ सालसाठी एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर हा किताब देण्यात आला आहे.

मानधनापूर्वी फक्त सुझी बेट्स ही महिला क्रिकेटपटू होती जिने दोनदा आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर हा किताब जिंकला होता. न्यूझीलंडच्या बेट्सने २०१३ आणि २०१६ मध्ये आयसीसी एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर किताब जिंकण्याचा मान मिळवला.

२०२४ हे वर्ष मानधनासाठी खूप खास राहिले आहे. २०२४ मध्ये मानधनाने १३ एकदिवसीय डावांमध्ये एकूण ७४७ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम जो मानधनाच्या नावावर आहे. अनुभवी भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने चामारी अटापट्टू (श्रीलंका), लॉरा वोल्वार्ड आणि अ‍ॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) यांना मागे टाकून हा किताब जिंकण्यात यश मिळवले.

यासोबतच, स्मृती मानधना ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे जिच्या नावावर ४ आयसीसी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे.

  • २०२४ मध्ये आयसीसी एकदिवसीय क्रिकेटपटू
  • आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर २०२१
  • २०१८ मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू
  • २०१८ मध्ये आयसीसी एकदिवसीय क्रिकेटपटू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *