
मुंबई : ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघाने भिवंडी येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर येथील सुरज माने, सुर्यकांत देसाई, विशाल जाधव, विशाल मटेकर, मनिषा शेलार यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यांनी गादी विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरिता या सर्वांची ठाणे संघात निवड झाली आहे. निवड चाचणी स्पर्धेत मनिषाने ५० किलो वजनी गटात पहिला क्रमांक मिळवला. मानेने ७९, सुर्यकांतने ८६, जाधवने ९२ आणि मटेकरने ९७ किलो वजनी गटात बाजी मारली. त्यांच्यांच गणेश शिंदे, सुयश झांबरे यांना रौप्य पदक मिळाले. सर्व पदक विजेत्यांना आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.