
राष्ट्रीय शालेय स्पर्धा : सीबीएसई दिल्ली उपविजेते, छत्तीसगढ तृतीय
छत्रपती संभाजीनगर : भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात यजमान महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
विभागीय क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ मकरंद जोशी, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, नटवर सिंह, किशोर चौधरी, शाकेर अली, सुबोध मिश्रा, विजय गौर, मृत्युंजय शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार डॉ भागवत कराड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळामुळे आरोग्य निरोगी राहून सांघिक खेळामुळे एकात्मता वाढीस लागते असे मनोगत व्यक्त केले आणि विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत मुख्य पंच म्हणून पंच प्रमुख अक्षय येवले, शिवाजी पाटील, विकास वानखेडे, कल्पेश कोल्हे, प्रज्वल जाधव, मंगेश इंगोले, मयुरेश औसेकर, प्रवीण गडका, गणेश बेटूदे, अक्षय बिरादार व पंच सहाय्यक सचिन बोर्डे, भीमा मोरे, रोहित तुपारे, यश थोरात, निखिल वाघमारे, गौरव साळवे, मयुरी गामके, ईश्वरी शिंदे, मयुरी चव्हाण, सायली किरगत, विशाल जारवाल, कार्तिक तांबे, शुभम जारवाल, गौरव खरे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे, लता लोंढे, खंडू यादवराव, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक पूनम नवगिरे, सचिन पुरी, सदानंद सवळे, अनिल दांडगे, सचिन बोर्डे, बी व्ही होण्णा, राकेश खैरनार, रफिक जमादार, प्रवीण शिंदे, गणपत पवार, प्रशांत पांडे, राणा कदम, बाजीराव भूतेकर, गौरव साळवे, निखिल वाघमारे, शुभम जारवाल, निखिल वाघमारे आदींनी पुढाकार घेतला होता.
अंतिम निकाल
१९ वर्षांखालील मुले : १. महाराष्ट्र, २. सीबीएसई दिल्ली, ३. छत्तीसगड.
१९ वर्षांंखालील मुली : १. महाराष्ट्र, २. दिल्ली, ३. छत्तीसगड.