
नांदेड : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्याचे चार वर्षांचे जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदान करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रलंबित होते. ‘स्पोर्ट्स प्लस’च्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्रीडा पुरस्कार वितरणातील सर्व अडथळे तातडीने दूर केले आणि त्यामुळे चार वर्षांतील क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव झाला.
सुशील कुरुडे (जिम्नॅस्टिक्स), अनिल पाटील (जिम्नॅस्टिक्स), वैशाली पाटील-जोगदंड (तिरंदाजी), मार्तंड चेरले (तिरंदाजी), अंजली भालेराव (जिम्नॅस्टिक्स), सज्जन भीमराव (दिव्यांग, अॅथलेटिक्स), आकाश बगाटे (जिम्नॅस्टिक्स), आकांक्षा सोनकांबळे (जिम्नॅस्टिक्स), योगेश गिरबनवाड (दिव्यांग, अॅथलेटिक्स), तेजबीरसिंग जहागीरदार (तिरंदाजी), सौख्या घेवारे (जिम्नॅस्टिक्स), दत्ता भारती (दिव्यांग, अॅथलेटिक्स), कैवल्य पुजारी (जिम्नॅस्टिक्स), सृष्टी जोगदंड (तिरंदाजी) या खेळाडू, प्रशिक्षकांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू लता उमरेकर यांना थेट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्य सभा खासदार डॉ अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे आदी मान्यवर उपस्थित होते.