
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धा २ फेब्रुवारी रोजी पीईएस कॉलेजच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात होणार आहे.
यामध्ये खेळाडूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, कार्याध्यक्ष डॉ रंजन बडवणे, उपाध्यक्ष प्राचार्य शशिकला निलवंत, सचिव डॉ फुलचंद सलामपुरे, मोहन मिसाळ, तांत्रिक अधिकारी डॉ दयानंद कांबळे यांनी केले आहे.
ही मैदानी स्पर्धा ८, १०, १२ व १४ वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या गटात रंगणार आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहेत. तर सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची पंढरपूर (जि. सोलापूर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
स्पर्धेसाठी प्रति इवेंट १०० रूपे प्रवेशिका ठेवण्यात आलेली असून प्रवेशिका जमा करण्याचे अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. अधिक माहितीसाठी सरस्वती भुवन वाणिज्य व कला महाविद्यालयाचे प्रा दयानंद कांबळे (९८३४८४१६१८) किंवा प्रा तुषार खेडकर (७३५०९०८०२१) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेला येताना मूळ जन्म दाखला व आधार कार्ड सोबत घेऊन येण्याचे सांगण्यात आलेले आहे.