
जळगाव : इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन व उत्तराखंड ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ट्रायथलॉन संघाच्या संघ व्यवस्थापकपदी कमलेश नगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा ट्रायथलॉन संघ सहभागी झालेला असून या संघाच्या व्यवस्थापकपदी जळगाव पोलिस दलाचे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय पंच कमलेश नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन अध्यक्ष दयानंद कुमार, सचिव राजेंद्र निंबाळते, जिल्हा असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र ओक, किशोर नेवे, प्रवीण ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.