
पुणे : उत्तराखंड, देहरादून येथे होणाऱ्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा टेनिस संघ जाहीर करण्यात आला आहे. विविध वयोगटात राज्यातील गुणवान खेळाडू या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

पुरुष व महिला सांघिक गट, एकेरी, दुहेरी आणि सांघिक स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा समावेश असून अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या कट ऑफ नियमानुसार हा संघ जाहीर करण्यात आला असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

पुरुष संघ : प्रसाद इंगळे, अनुप बंगार्गी, अर्णव पापरकर, संदेश कुरळे, निशित रहाणे. प्रशिक्षक : केतन धुमाळ, व्यवस्थापक : राजीव देसाई.

महिला संघ : ऋतुजा भोसले, वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तूरे, पूजा इंगळे, सोनल पाटील. प्रशिक्षक : ऋतुजा कुलकर्णी, व्यवस्थापक : शीतल भोसले.
महिला एकेरी व दुहेरी : ऋतुजा भोसले व वैष्णवी आडकर.
मिश्र दुहेरी : अर्णव पापरकर व वैष्णवी आडकर.
सांघिक पुरुष गट : प्रसाद इंगळे, अनुप बंगार्गी, अर्णव पापरकर, संदेश कुरळे, निशित रहाणे.
सांघिक महिला गट : ऋतुजा भोसले, वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तूरे, पूजा इंगळे, सोनल पाटील.