
छत्रपती संभाजीनगर : वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील मुले व मुली राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्हॉलीबॉल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २००९ रोजी नंतरची असावी. वयाच्या पुराव्यासाठी खेळाडूंनी आधार कार्ड व शाळेचे बोनाफाईड सादर करावे. या निवड चाचणी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील १६ वर्षांखालील मुले व मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन विभागीय सचिव सतिश पाठक, जालना जिल्हा सचिव अर्षद काझी, परभणी जिल्हा सचिव राजीव कामखेडे, हिंगोली सचिव नाविद पठाण, छत्रपती संभाजीनगर व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष सय्यद रफत, उपाध्यक्ष उन्मेश शिंदे, प्रवीण शिंदे, अक्रम काझी, प्रफुल्ल कुलकर्णी, सोमनाथ पचलुरे, जोती दांडगे, जब्बार पठाण, आसिफ शेख, रोहित पाटील, नारायण शिंदे, विलास राजपुत, गणपत पवार, सोमनाथ टाक यांनी केले आहे.