मुंबई कॅरम स्पर्धेत सांघिक गटात मुंबई महानगरपालिकेला विजेतेपद

  • By admin
  • January 29, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

मुंबई : लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल आणि ओएनजीसी पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतर संस्था सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई महानगरपालिकेच्या अ संघाने रिझर्व्ह बँकेच्या संघावर ३-० असा सहज विजय मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

पहिली एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेला २५-१५, ९-२५, २५-२२ असे चुरशीच्या लढतीत पराभूत केले व विजेतेपद पटकावले. दुसरी एकेरी लढतीत गिरीश तांबेने हिदायत अंसारीवर १२-२५, २०-१९, २२-१४ असा रोमांचक विजय मिळवला. तसेच संतोष जाधव व दिनेश केदार जोडीने महेश कुपेरकर व अजय आंब्रे जोडीला २५-०, २५-० असा एकतर्फी पराभूत करत संघाचा विजय निश्चित केला.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबई महानगरपालिकेच्या ब संघाने बीईएसटी संघाविरुद्ध २-१ असा विजय मिळवला. या लढतीत भरत कोळीने बीईएसटी संघाच्या निलेश पवारला २३-१७, १५-१२ असे पराभूत केले. बीईएसटी संघाच्या संदीप जोगळेने महेंद्र वाघ याला २४-११, १६-१४ असे हरवून सामना बरोबरीत आणला. निर्णायक दुहेरी सामन्यात मुंबई महानगरपालिकेच्या मयूर जाधव आणि मंगेश कासारे जोडीने अंकुश गायकवाड आणि हेमंत मोरेला २५-१७, १४-१३ असे हरवून संघाला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले.

विजेत्या संघात विनोद बारिया, संतोष सावंत, गिरीश तांबे, संतोष जाधव, दिनेश केदार, विकास धारिया यांचा समावेश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *