
शिवाजी पार्क येथे स्पर्धेचे आयोजन
मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १६ वर्षांखालील शालेय मुला-मुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील मंदिर परिसरात होणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या या अनोख्या स्पर्धेची घोषणा समितीचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी केली.
प्रथमच मोफत शालेय कॅरम स्पर्धा श्री उद्यानगणेश मंदिर समितीतर्फे आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने चॅम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने होणार आहे.
पहिल्या ८ विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना चषक आणि विशेष स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी संजय आईर, चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याशी संपर्क साधावा.