
सोलापूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या शेवटच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा सामना त्रिपुरा संघाशी होणार आहे. हा सामना गुरुवारपासून सोलापूर शहरात सुरू होणार आहे. इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
गेल्या वर्षी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उत्कृष्ट नियोजनामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात रणजी सामना सोलापूर येथे आयोजित करण्याची संधी दिली आहे. या सामन्यात दोन्ही संघात दिग्गज खेळाडू असून सोलापूरकरांना एक चांगला सामना पाहण्याची संधी मिळाली आहे.
त्रिपुरा संघाचा कर्णधार मनदीप सिंग असून महाराष्ट्र संघाकडून अंकित बावणे, रामकृष्ण घोष असे नावाजलेले खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.
चार दिवसीय या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार असून हा सामना जिंकून विजयी सांगता करण्याचा महाराष्ट्र संघाचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांनी या लढतीसाठी कसून सराव केला आहे. दोन्ही संघाचा हा सातवा सामना असून महाराष्ट्र संघाने ६ पैकी २ सामने जिंकले आहेत. नाशिक येथे बलाढ्य बडोदा संघाविरुद्ध विजय प्राप्त करत १४ गुणासह गटात सहाव्या स्थानी महाराष्ट्र संघ आहे. त्रिपुरा संघाला सहा सामन्यात केवळ १ विजय मिळवता आला आहे. त्रिपुरा संघाचे १३ गुण आहेत.
महाराष्ट्र संघ
अंकित बावणे, सौरभ नवले, सिद्धेश वीर, पवन शहा, यश क्षीरसागर, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज, प्रशांत सोळंकी, रजनीश गुरबानी, प्रदीप दधे, किरण चोरमले, योगेश चव्हाण, सत्यजित बच्छाव, धनराज शिंदे, सनी पंडित.
त्रिपुरा संघ
मनदीप सिंग, बिक्रम कुमार दास, जीवनज्योत सिंग, श्रीदाम पॉल, शरथ श्रीनिवास, रियाझ उद्दैन, मनी संकर मुरा सिंग, राणा दत्ता, रजत डे, अर्जुन देबनाथ संकर पॉल, विकी साहा, चिरनजीत पॉल, जोयदीप बाणिक, तेजस्वी जयस्वाल, अजय सरकार, जोयदेब देब.