
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हौशी बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने व पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि अश्वमेघराज चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे रविवारी (२ फेब्रुवारी) विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार येथे पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये रविवारी सकाळी ९ वाजेपासून विभागीय बुद्धिबळ स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण विभागातून खेळाडूंना सहभागी होता येणार असून शंभरहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धा ही एकदिवस स्वीसलीग पद्धतीने एकूण ६ फेर्यांमध्ये रंगणार असून स्पर्धेत रेटेड आणि अनरेटेड असे दोन गट करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम दहा खेळाडूंना रोख परितोषिकांसह आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील ९ वर्षांखालील, ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील तसेच उत्कृष्ट शाळेसह विविध गटात प्राविण्य मिळविणार्या खेळाडूंना देखील विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील ८ वर्षांखालील सर्व खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव तसेच स्पर्धा प्रमुख शोभराज खोंडे (8484840974) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळ, विविध क्रीडा संघटना, क्लब यातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे चेअरमन डॉ शिल्पा भंडारी, अध्यक्ष बळवंत निकुंभ, उपाध्यक्ष ईश्वर धामणे, प्राचार्य अमोल पगारे, योगेश निकुंभ, धनराज अहिरे, निलेश गावंडे, अश्वमेघराज खोंडे यांनी केले आहे.