
बीपीएड व एमपीएड अभ्यासक्रम सुरू करणार; कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांची माहिती
अजितकुमार संगवे
सोलापूर : ‘खेलो इंडिया’ नाही तर ‘खेलो सोलापूर’च्या माध्यमातून खेळाडूंच्या विकासास गती देण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ करीत आहे.
याचाच एक भाग म्हणून सोलापूर विद्यापीठ आता क्रीडा शिक्षक घडविण्याचे काम करणार आहे. यासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात बीपीएड व एमपीएड हे अभ्यासक्रम सुरू करणार सुरू करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी दिली
तत्कालीन कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस व क्रीडा संचालक डॉ सुरेश पवार यांच्या प्रयत्नातून विद्यापीठाने भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टीपर्पज इनडोर हॉल निर्माण करण्याकरिता वीस कोटीचा क्रीडा प्रकल्प मंजूर करून आणला.
तत्पूर्वी, हा मल्टीपर्पज हॉल व्हावा यासाठी अधिसभा सदस्य प्रा सचिन गायकवाड यांनी हा ठराव अधिसभेत मांडून मंजूर करून घेतला. सुरुवातीस साडेचार कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. नंतर विद्यापीठ विकास निधीतून या हॉलला निधी मिळण्यासाठी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा गायकवाड यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. त्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्या हॉलच्या परिसरातच विद्यापीठ हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करणार आहेत.
विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार
कुलगुरू डॉ प्रकाश महानवर म्हणाले, ‘मल्टीपर्पज इनडोर हॉल परिसरास मेजर ध्यानचंद क्रीडा संकुल असे नाव प्रस्तावित आहे. त्या मल्टीपर्पज हॉलचा वापर खेळाडूना होण्यासाठी स्कूल ऑफ स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. केंद्र शासनाकडून असा प्रकल्प मंजूर झालेले महाराष्ट्रातले एकमेव असे सोलापूर विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरातील एक एकर जागेवर खेळाडूंसाठी जागतिक दर्जाचा अगदी सुसज्ज असा ४० बाय ६० मीटरचा मल्टीपर्पज हॉल साकारत आहे. १५०० प्रेक्षक बसू शकतील, अशी प्रेक्षक गॅलरी आहे. या मल्टीपर्पज हॉल मध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, ज्यूदो, कबड्डी, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस यासह विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार आहेत.
आउटडोअर स्टेडियमचा ७८ कोटींचा प्रस्ताव
इनडोअर हॉल नंतर आता आउटडोअर स्टेडियमचा प्रस्ताव विद्यापीठाने केंद्र शासनाकडे पाठवला आहे. ७८ कोटींचा हा प्रस्ताव असून यात ऑलिम्पिक साईजचा जलतरण तलाव, सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, धनुर्विद्या व जिम्नॅस्टिक आदीचा समावेश आहे. तसेच खेळाडूंसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितले.

तत्कालीन कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस व क्रीडा संचालक डॉ सुरेश पवार यांच्या प्रयत्नातून विद्यापीठाने भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टीपर्पज इनडोअर हॉल निर्माण करण्याकरिता २० कोटींचा क्रीडा प्रकल्प मंजूर करून आणला. तो आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्या हॉलच्या परिसरातच विद्यापीठ हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करणार आहेत.
विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार
कुलगुरू डॉ प्रकाश महानवर म्हणाले की, ‘मल्टीपर्पज इनडोर हॉल परिसरास मेजर ध्यानचंद क्रीडा संकुल असे नाव प्रस्तावित आहे. त्या मल्टीपर्पज हॉलचा वापर खेळाडूंना होण्यासाठी स्कूल ऑफ स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. केंद्र शासनाकडून असा प्रकल्प मंजूर झालेले महाराष्ट्रातले एकमेव असे सोलापूर विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरातील एक एकर जागेवर खेळाडूंसाठी जागतिक दर्जाचा अगदी सुसज्ज असा ४० बाय ६० मीटरचा मल्टीपर्पज हॉल साकारत आहे. १५०० प्रेक्षक बसू शकतील, अशी प्रेक्षक गॅलरी आहे. या मल्टीपर्पज हॉल मध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, ज्यूदो, कबड्डी, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस यासह विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार आहेत.’
आउटडोअर स्टेडियमचा ७८ कोटींचा प्रस्ताव
इनडोअर हॉल नंतर आता आउटडोअर स्टेडियमचा प्रस्ताव विद्यापीठाने केंद्र शासनाकडे पाठवला आहे. ७८ कोटींचा हा प्रस्ताव असून यात ऑलिम्पिक साईजचा जलतरण तलाव, सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, धनुर्विद्या व जिम्नॅस्टिक आदींचा समावेश आहे. तसेच खेळाडूंसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितले.