
चिखली : चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या सीनियर विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी गणेश पेरे यांची बुलढाणा कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान सीनियर विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होणार आहे. विदर्भ ॲम्युचर कबड्डी असोसिएशन खामगाव बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दिलीपकुमार सानंदा व सचिव अशोक देशमुख यांनी गणेश पेरे यांचे अभिनंदन केले. गणेश पेरे यांची नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच म्हणून निवड करण्यात आली होती.
गणेश पेरे हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ बुलढाणा जिल्हा या मंडळाचे सचिव म्हणून काम पाहतात. तसेच गणेश पेरे हे विदर्भ कुस्ती असोसिएशन व एज्युकेशन ॲड स्पोर्ट्स प्रमोशन फाऊंडेशन देखील सचिव म्हणून काम पाहतात. ईएसपीएफ मध्ये महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.