परभणीची आद्या बाहेती महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघात

  • By admin
  • January 30, 2025
  • 0
  • 110 Views
Spread the love

परभणी : परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू आद्या महेश बाहेती हिची ८६व्या कॅडेट सब जुनिअर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

इंदूर (मध्य प्रदेश) येथे ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा वीस जणांचा संघ जाहीर झाला असून यामध्ये अकरा वर्षे मुलींच्या गटात परभणीच्या आद्या बाहेती हिची निवड झाली आहे. आद्या बाहेती ही सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी तिने चार वेळेस राज्य अजिंक्यपद पटकावले आहे. आद्या बाहेतीला टेबल टेनिस क्रीडा मार्गदर्शक चेतन मुक्तावार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या निवडीबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड आशितोष पोतनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी ननक्सिंह बस्सी, सुयश नटकर, रोहन औद्येकर परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर, सचिव गणेश माळवे, डॉ माधव शेजुळ, परभणी क्लबचे सचिव डॉ विवेक नावंदर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *