
नागपूर : नागपूर पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी व्हीसीए लाइफ मेंबर्स आणि संलग्न क्लब्सना भारत आणि इंग्लंड यांच्यातील ६ फेब्रुवारी रोजी जामठा स्टेडियमवर होणाऱ्या आगामी पहिल्या वनडेसाठी तिकीट विक्रीचे उद्घाटन केले.
या प्रसंगी पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांचे व्हीसीए सिव्हिल लाईन्स स्टेडियम संकुलात स्वागत करण्यात आले. विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विनय एम देशपांडे, उपाध्यक्ष डॉ अविनाश देशमुख, सचिव संजय बडकस, सहसचिव गौतम काळे, खजिनदार तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष अर्जुन फाटक, ॲड आनंद देशपांडे आणि व्हीसीए सदस्य आणि अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.