
छत्रपती संभाजीनगर : राजर्षी शाहू विद्यालयातील क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय खेळाडू आणि आरएसपी जिल्हा उपाध्यक्ष अँड सी डी संघटना महाराष्ट्र राज्य व शिक्षक भारती माध्यमिक जिल्हा सहाकार्याध्यक्ष विजयकुमार संदिपान मुळे हे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
सेवानिवृत्त होत असल्याबद्दल विजयकुमार मुळे यांचा सेवापूर्ती व कार्यागौरव कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा मिराकी (आदित्य हॉटेल) सूर्यालॉन्सच्या पूर्वेस या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड बी एल सगर किल्लारीकर, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा गोपाळराव बिराजदार, शिक्षक भारतीचे राज्य संपर्क प्रमुख सुभाष महेर, राज्य नेते प्रकाश दाणे, राजश्री शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहुराज मुगळे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन अमृत बिऱ्हाडे, शिवाजी वायाळ, राजेंद्र रोडे, पद्मसिंह राजपूत, बेस्के एस एम, बिजू मारग, राजेंद्र देवरे, रमेश प्रधान, संजय बाजी पाटील, मारुती पांढरे, दीपक सपकाळ, राजू थिटे पाटील, मारुती जगताप, विकास कवडे, संजीव बिराजदार, गणेश वाघ, कैलास चव्हाण, शिंदे मामा, मुक्तानंद गोस्वामी यांनी केले आहे.