
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयातील कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन-पुणेचा नामांकित महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा राकेश खैरनार यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून देवगिरी महाविद्यालयातील व मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी व पदक प्राप्त करून दिली आहे.
प्रा राकेश खैरनार यांनी या पुरस्कारामुळे माझे क्रीडा क्षेत्रातील जबाबदारी अधिक वाढली असून क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान करणार असे मत व्यक्त केले. प्रजासत्ताकदिनी पुरस्कार प्राप्त राकेश खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, प्रदीप चव्हाण, कार्यकारणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, डॉ आदित्य येळीकर, विवेक जैस्वाल, प्रशासकीय अधिकारी प्रा एफ जी माळी, सह प्रशासकीय अधिकारी प्रा सुधीर श्रीखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य गणेश मोहिते, उपप्राचार्य प्रा नंदकिशोर गायकवाड, उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे यांनी अभिनंदन केले आहे.