
सोलापूर : डेहराडून (उत्तराखंड) येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांची महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती केली आहे.
लॉन टेनिस खेळाच्या सांघिक व वैयक्तिक एकेरी व दुहेरी गटाच्या स्पर्धा ५ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत खेळवल्या जाणार आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी, उपाध्यक्ष दिलीप बचुवार, कोषाध्यक्ष दिलीप अत्रे, संयुक्त सचिव पंकज शहा, व्यवस्थापक संध्याराणी बंडगर यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा संघ ३ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडला रवाना होणार आहे.