
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय आणि राज्य खेळाडूंचा कन्नड तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कन्नड तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष व आमदार संजना ताई जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष गोराड व उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूर वाड, संकुल समितीचे कार्याध्यक्ष व तहसीलदार विद्याचरण कवडकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अभय कृष्णा शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रहरी ढोकणे, तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य प्रवीण शिंदे, कन्नड शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगराव सानप, ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ रामचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू समृद्धी शिंदे व राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू रूपाली आनंद शिंदे व आयुष मोरे, थ्रो बॉलचा राज्यस्तरावर पात्र झालेला फातिमा शाळेच्या संघाचा सत्कार करण्यात आला. तसेच मुलींमध्ये राज्यस्तरीय थ्रो बॉल मध्ये मुलींचा संघ मदर गंगा व देवगिरी हायस्कूलचा संघ व प्रोबल प्रशिक्षक विशाल दांडेकर व कल्याणी चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.