
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठ वर्धापनदिनानिमित्त आंतर विद्यापीठ या क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे क्रीडा संचालक यांच्यातर्फे ब्लेझर व ट्रॉफी देऊन डॉ दिनकर हंबर्डे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ मनोहर चासकर हे होते. या प्रसंगी प्र कुलसचिव डॉ ज्ञानेश्वर पवार, प्राचार्य डॉ सूर्यकांत जोगदंड, चौधरी एम. व विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ भास्कर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यशाबद्दल माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, संस्थेचे अध्यक्ष रणजीत भाऊराव पाटील गोरेगावकर, प्राचार्य डॉ जयवंत भोयर, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिनकर हंबर्डे यांचे अभिनंदन केले आहे.