
छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी परिसरातील सक्सेस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व मुलांचे वसतिगृह येथे १७वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे व उद्घाटक म्हणून डॉ उमेश रायते हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सहाणे, पिसादेवी केंद्र प्रमुख एम बी सुरडकर, पी एस भवर, मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण आव्हाळे, संस्थेचे अध्यक्ष संदीप लगामे पाटील, संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका विजयश्री बारगळ, संस्थेचे उपाध्यक्ष वेदांत पाटील, आरोही पाटील, राहुल पाटील उपस्थित होते.
‘सावित्री तू शिक’ या संकल्पनेवर वार्षिक स्नेहसंमेलन आधारित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नाटीकेद्वारे शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ हे एक पात्री नाटक दिव्या काळे या विद्यार्थिनीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी गायन व फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
‘खेळ पैठणी’चा या कार्यक्रमात संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक मंगल काळे, द्वितीय क्रमांक कल्पना राऊत, तृतीय क्रमांक स्वाती पायगव्हाण यांनी संपादन केला. तसेच उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना राऊत, द्वितीय क्रमांक मंगल काळे, तृतीय क्रमांक गीता बोरडे यांनी मिळवला. या सर्व महिलांचा शाळेतर्फे पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अर्चना डमरे, पूजा राऊत, नीलम जैस्वाल, उबाळे, सुरेश राठोड, मोरे, वाघचौरे, आढाव यांनी पुढाकार घेतला होता.