< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); स्क्वॅशमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत – Sport Splus

स्क्वॅशमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

  • By admin
  • February 1, 2025
  • 0
  • 177 Views
Spread the love

डेहराडून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्क्वॅश क्रीडा प्रकारातही महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम राखून सांघिक पुरूष व महिला दोन्ही गटातील अंतिम फेरीत धडक दिली. रविवारी दोन्ही संघ तामिळनाडू विरूद्ध सुवर्णपदकासाठी झुंजतील.

महाराणा प्रताप क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्क्वॅशमध्ये उपांत्य लढतीत पुरुष संघाने सर्व्हिसेसचा २-१ पराभव केला. महिला संघाने उत्तर प्रदेशवर २-१ ने मात करून अंतिम फेरी गाठली. पुरूषांच्या सेनादल विरूद्ध ३ पैकी २ लढतीत राहुल भाटिया व सुरज चांद यांनी विजय संपादन केले. तामिळनाडूने मध्यप्रदेशला २-० हरवून अंतिम फेरी गाठली.

महिलांच्या उपांत्य सामन्यात पहिला सामना महाराष्ट्राने गमविला. उत्तर प्रदेशच्या उन्नती त्रिपाठी हिने महाराष्ट्राच्या आकांक्षा गुप्तावर ५ सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मात केली. दुसर्‍या व तिसर्‍या लढतीत महाराष्ट्राच्या सुनीता पटेल व आनिका दुबे यांनी एकतर्फी विजय मिळवीत महाराष्ट्रासाठी अंतिम फेरीचे द्वार खुले केले. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन अंतिम लढतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *